Work Hard in Silence..Let Your SuccessNoise..

बदली संवर्ग 1 मधील शिक्षकांसाठी विषय- विशेष संवर्ग -1 च्या बदलीचे Form भरले असल्यास त्याची हार्ड Copy Office ला सादर करणेबाबत… महॊद्य / महोद्या आपणांस कळविण्यात येते की आपण जर संवर्ग 1 अंतर्गत जिल्हा अंतर्गत बदली साठी Online Form भरले असल्यास सदर Form ची Hard Copy ( Print ) तसेच त्या सॊबत खालील आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. 1) जन्मातारखेचा पुरावा (Service Book च्या पानाची Zerox जेथे जन्मतारखेचा उल्लेख असल्यास, उत्तम ) 2) सेवा सुरू तारखेचा पुरावा 3) या शाळेवरील रूजु तारखेचा पुरावा 4) ज्या विशेष संवर्ग 1 मधुन आपण Form भरला आहे ,त्याचा पुरावा. 5) जातीच्या दाखला 6) जात पडताळणी दाखला ज्या संवर्ग 1 मधील शिक्षकांनी बदली साठी नकार दिला आहे त्यांनी सुद्धा नकार दिलेल्या Form ची हार्ड Copy जमा करायची

तालुक्यविषयी

" माझा तालुका…वेल्हे तालुका "


सह्याद्रीच्या च्या कुशीत वसलेला माझा तालुका ..वेल्हे तालुका…

या तालुक्याची ऒळख फ़ार अतिदुर्गम तालुका अशीच केली जाते..डॊंगरात बसलेले छॊटे छॊटे गावं आणि प्रत्येक गावात जिल्हा परिषद शाळा… सर्वच शाळा अतिदुर्गम नसल्या तरी काही शाळांवर पॊहचणे म्हणजे मॊठं दिव्यच..तरी या तालुक्यातील शिक्षक या शाळा टिकविण्यासाठी सर्वॊतॊपरी प्रयत्न करतात..


तर,चला मी थॊडक्यात तुम्हाला माझ्या तालुक्याविषयी माहीती सांगतॊ..



महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या नकाशावरील वेल्हे तालुका दर्शविणारे स्थान




जिल्हा उप-विभाग
भोर
मुख्यालय
वेल्हे






बारामती
भोर
संग्राम थोपटे
२५००-३००० मिमी

























                  इतिहास


राजगड किल्ला साधारण २००० वर्षापूर्वीचा आहे. सन १६४५ मध्ये शिवरायांनी किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले राजगड असे नामकरण केले. मराठेशाहीची २६ वर्षे राजधानी याव्यतिरिक्त सदर किल्ल्यावर राजारामाचा जन्म सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकिय केंद्र. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदुस्वराज्याची ग्वाही देत उभा आहे.

पुण्याच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर भोरच्या वायव्येला २४ की.मी. अंतरावर, नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नद्यांच्या खोर्याच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळभागात राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते.

तोरणा जरी अभेद्य असला तरी बालेकिल्ला आकाराने लहान असल्याने राजकीय केंद्र म्हणुन हा किल्ला सोयीचा नव्हता. त्या मानाने राजगड हा दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा आहे. शिवाय, राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते.

      राजगडाला तीन माची बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला सर्वात उंच असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची १३९४ मीटर आहे. नंतर राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्यामानाने ऐसपैस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली.

किल्याक़डे खरिवपासून् जाता येते.



                     पर्यावरण

पर्यटकांना वेल्हे तालुक्यातील डोंगरकपारीतून वाहणारे झरे, हिरव्यागार वनराजीतून फेसाळत कोसळणारे धबधबे, हिरवी वस्त्रे परिधान केलेली भातशेतीची खाचरे, रिमझिम पावसातील धुक्याची दुलई आणि दुसरीकडे ताठ मानेने स्वराज्याच्या इतिहासाची भक्कम साक्ष देणारे राजगड, तोरणा हे किल्लेअसा ऐतिहासिक वारसा दिमाखात मिरवणारा हा परिसर पर्यटकांसाठी एक पर्वणीच आहे. ……. वर्षा विहारासाठी पावसाळ्यात निसर्गाच्या कुशीत विसावण्याकडे हल्लीच्या पर्यटकांचा कल वाढतो आहे. नवीन पर्यटनस्थळाच्या शोधात असणाऱ्या तरुण पर्यटक आणि भटकंतीसाठी सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगेवरील हा निसर्गरम्य परिसर खुणावतो आहे.

महाबळेश्वर, लोणावळा, पाचगणी या ठिकाणांचा तोचतोचपणा, गर्दी- गोंगाट, प्रदूषण, वाढती महागाई याने त्रस्त झालेल्या पर्यटकांना येथे त्याहीपेक्षा सरस असे सौंदर्य शांत, गर्दी-गोंगाटापासून दूर प्रदूषणमुक्त, कमी खर्चात पुणे शहरापासून जवळच्या अंतरावर सहजपणे पाहता येईल. वेल्हे गावाजवळ हिरव्यागार वनराजीत नटलेला समुद्रसपाटीपासून १४०३ मीटर उंचीवरचा तोरणा किल्ला आपल्या डोळ्यांचे पारणे फेडतो. या गडावरून हिरव्यागार डोंगर रांगा, दऱ्या, पांढऱ्याशुभ्र पाण्याचे धबधबे पाहताना मन ताजेतवाने होते. या किल्ल्यावरून अनेक किल्ले पठारांचे दर्शन होते. राजगड- शिवछत्रपतींच्या स्वराज्याची राजधानी असलेला निसर्गाच्या कुशीत वसलेला ट्रेकिंगसाठी आव्हानात्मक असा पर्यटकांना भुरळ घालणारा किल्ला आहे.

सुवेळा, संजीवनी पद्मावती अशा तीन माच्यांमध्ये किल्ल्याचा भलामोठा विस्तार आहे. सुवेळा संजीवनी माचीवरून भाटघर धरणाच्या बॅकवॉटरचे (पाणीसाठ्याचे) विहंगम दृश् पाहायला मिळते, तसेच या गडावर जिवंत पाण्याची २५ लहान-मोठी तळी (टाके) शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई यांची समाधी आहे.

गुंजवणी धरण- वेल्हे गावापासून जवळच असलेले गुंजवणी धरण आहे. धरणाच्या रुंद भिंतीवरून जलाशयाचे आजूबाजूचे सौंदर्य पाहून मन प्रसन्न होते. पानशेत धरण- जलाशयात बोट क्लब सुविधा असून, हिरव्यागार निसर्गाच्या कुशीतील हा प्रचंड जलाशय पाहताना पर्यटकांना अत्यानंद होईल. त्याचबरोबर वर्षाविहारातील नौकाविहाराचा आनंदही घेता येईल.

केळदचा मढेघाट म्हणजे मिनी महाबळेश्वर-वेल्हेपासून १६ किलोमीटर अंतरावर कोकण कड्यावरील शेवटचे गाव म्हणजे केळद निसर्गाच्या गालिच्यावर वसलेले हे दुर्गम गाव. केळद म्हणजे मिनी महाबळेश्वर आहे. अंगाला झोंबणारा गार वारा धुक्याच्या दुलईतून चालताना अवकाशात गेल्याचा होणारा भास आणि धुक्यातील दवबिंदू अंगावर साचल्यानंतर हिवाळ्याची आठवण होते. या ठिकाणचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण नेहमी पावसाच्या जलधारा वरून खाली येताना पाहतो, पण येथे कड्यावर खालून वर येणाऱ्या पावसाच्या जलधारांचे नयनरम्य विलोभनीय सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालील.

कोदवडी डोंगरमाथा येथून भाटघर धरणातील पाण्याच्या प्रचंड जलाशयाचे विलक्षण दृश् पाहता येते, तसेच गुंजवणे खोऱ्यातील निसर्गरम्य दऱ्याखोऱ्याचा प्रदेश पाहता येतो.

काय पाहालतोरणा किल्ला राजगड किल्ला गुंजवणी धरण पानशेत धरण केळदचा मढेघाट म्हणजे मिनी महाबळेश्वर कोदवडीचा डोंगरमाथ्यावरूनचे दृश्य..


                   सामाजिक माहिती

    *मराठी भाषा

मराठी भाषा महाराष्ट्र गोवा राज्याची राजभाषा असून सुमारे कोटी लोकांची मातृभाषा आहे. मराठी भाषा कमीत कमी १००० वर्षापासून अस्तित्वात आहे.[१४] भारतीय संविधानाने मराठीला इतर २२ भाषांबरोबर अनुसूचित भाषेचा दर्जा दिला आहे.

मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाने प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा संस्कृतीची भरभराट झाली. शके १११० मध्ये मुकुंदराज या कवीने विवेकसिंधु या काव्य ग्रंथाची रचना मराठी भाषेत केली. त्यानंतर शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. या नंतर महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात भक्तीपंथाच्या काव्याची मौलिक भर घातली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. .. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. .. १९६० मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. .. १९३०[संदर्भ द्या] पासून मराठी साहित्य संमेलन सुरु झाले. मराठी साहित्यिकांनी १९९० च्या दशकापर्यंत मराठी साहित्याचा कळस गाठला.



















                           (from Wikipedia..)