➦नमस्कार
मित्रानो ..संवर्ग २ च्या online बदली form भरायला सुरुवात झाली
आहे..त्यानंतर लगेच इतर संवर्गाच्या माहिती भरायला सुरुवात होईल.
त्यामुळे सर्वानी आपली staff portal ची माहिती अपडेट करून घ्या तसेच
केंद्र प्रमुख स्तरावरून वेरिफाइड करून घ्या,जेणेकरुन वेळेवर धावपळ होणार
नाही...
Keep Visiting this Blog for New Updates
विशेष शिक्षक संवर्ग भाग मध्ये कोणते कर्मचारी येतात?*
➡
*ज्या शिक्षक कर्मचाऱ्याचा जोडीदार हा त्याच्या शाळेपासून ३० कि.मी पेक्षा
अधिक अंतरावर कार्यरत आहे.असेच शिक्षक या संवर्गात अंतर्भूत होतात.अशाच
शिक्षकांनी विशेष शिक्षक सवर्ग भाग-२ अंतर्गत उपलब्ध करून दिलेला फॉर्म
भरणे अपेक्षित आहे.*
➡
*तसेच ३० कि.मी पेक्षा कमी अंतर असणारे पती पत्नी यांचा समावेश या
संवर्गात होत नाही .या शिक्षकांच्या बदली संदर्भात किंवा बदलीसाठी फॉर्म
भरावयाच्या कार्यवाही संदर्भात शासन निर्णयाचे अवलोकन करावे.अशा
शिक्षकांसाठी यथावकाश सूचना देण्यात येतील तेंव्हा त्यांनी फॉर्म भरावे.*
➡
*निरीक्षणानंतर असे लक्षात आले आहे की ३० की.मी पेक्षा कमी अंतर असणारे
शिक्षक देखील विशेष शिक्षक सवर्ग भाग-२ मध्ये फॉर्म भरत आहेत जे पूर्णपणे
चुकीचे आहे.अशा सर्व शिक्षकांना सूचित करण्यात येत आहे की,कोणत्याही
परिस्थितीमध्ये अशा चुकीच्या पद्धतीने आपण फॉर्म भरू नये.आपल्या
जोडीदाराच्या शाळेपासूनचे अंतर फॉर्म पडताळणी करताना अतिशय काटेकोरपणे
तपासले जाणार आहेत.
➡ *विशेष शिक्षक सवर्ग भाग-२
अंतर्गत ज्या पती पत्नीच्या शाळेमधील अंतर ३० की.मी.पेक्षा जास्त आहे असे
ग्रुहीत धरून ट्रांसफर पोर्टल मध्ये फॉर्मची रचना तयार करण्यात आलेली
आहे.जे पती पत्नी दोघेही जि.प.च्या शाळांमध्ये कार्यरत आहेत व त्यांच्या
शाळेमधील अंतर ३० की.मी.पेक्षा जास्त आहे अशा शिक्षकांची बदली करताना
सिस्टीम मध्ये प्रत्यक्ष किलोमीटरची आवश्यकता भासणार असल्याने अशाच
कर्मचा-यांना ते अंतर नमूद करण्याची सुविधा फॉर्ममध्ये उपलब्ध करून दिलेली
आहे.*
➡
*जि.प.शाळेव्यतिरिक्त इतर कार्यालयात सेवेत असणाऱ्या कर्मचा-याच्या
बाबतीत प्रत्यक्ष अंतर घेण्याची आवश्यकता भासणार नसल्याने व विशेष शिक्षक
सवर्ग भाग-२ मध्ये ३० की.मी पेक्षा जास्त अंतर असणाऱ्याच शिक्षकांनी फॉर्म
भरणे अपेक्षित असल्याने अशा कर्मचाऱ्याच्या बाबतीत फॉर्म भरताना अंतराची
नोंद करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही.परंतू जे कर्मचारी जोड़ीदाराच्या
ठिकानापासून ३० की.मी पेक्षा कमी अंतरामध्ये कार्यरत आहेत असे शिक्षक
सुद्धा ट्रांसफर पोर्टलमध्ये फॉर्म भरत आहेत असे लक्षात आले आहे. जे
पूर्णपणे चुकीचे आहे.अशा पद्धतीने फॉर्म भरता येऊ नये म्हणून अशा
शिक्षकांसाठी देखील आपल्या जोड़ीदाराच्या ठिकाणाचे अंतर नमूद करण्याची
सुविधा विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ चा फॉर्म भरताना दि.१७/०७/२०१७ दुपारी 2 वाजलेपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.*
➡
*वेगवेगळ्या जिल्ह्यात असणारे पती-पत्नी विशेष शिक्षक संवर्ग भाग-२
अंतर्गत फॉर्म भरण्यासाठी पात्र आहेत अशा अर्थाच्या पोस्ट whatsapp ग्रुप
वर येत असल्याचे दिसून आले आहे.तरी अशा पोस्ट वर विश्वास ठेवू नये.सदर बदली
प्रक्रिया ही जिल्हाअंतर्गत बदली साठी असल्याने एकाच जिल्ह्यात कार्यरत
असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यासाठी उपलब्ध आहे याची नोंद घ्यावी.वेगवेगळ्या
जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या पति-पत्नी या सुविधेमध्ये फॉर्म भरू शकत नाही
हे लक्षात घ्यावे.*
➡ *महत्वाची सूचना:* *या पोस्ट द्वारे अशी सूचना देण्यात येते की,वरील कारणास्तव सध्या विशेष शिक्षक सवर्ग भाग-२ अंतर्गत
पती-पत्नी दोघेही जि.प.शाळेत कार्यरत आहेत अशाच प्रकारच्या शिक्षकांनी
ट्रांसफर पोर्टलमध्ये फॉर्म भरावेत.इतर कार्यालयात आपला जोडीदार कार्यरत
असेल आणि आपणास संवर्ग-२ मधून फॉर्म भरावयाचा असेल तर आपण उद्या दुपारी १२
पर्यंत फॉर्म भरू नये.कारण आता आपणास या फॉर्म मध्ये अंतर नोंदवण्याची
सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.*
➡ *आजपर्यंत दिवसभरात इतर प्रकारातील ज्या कर्मचाऱ्यानी
आपल्या जोडीदाराच्या कार्यालयाच्या अंतराची नोंद न करता फॉर्म भरले आहेत
अशा कर्मचा-याचे फॉर्म जरी व्हेरिफाय झालेले असतील तरी त्यांच्या
जोडीदाराच्या कार्यालयाच्या अंतराची नोंद करण्याकरीता हे सर्व फॉर्म
सिस्टिम द्वारे अनवेरीफाय करून अपडेट करण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार
आहेत.अशा शिक्षकांनी आपल्या फॉर्ममध्ये सोमवार दि.१७/०७/२०१७ सायंकाळी ६
वाजेपर्यंत दुरुस्ती करून घ्यावी अन्यथा आपले फॉर्म बदली साठी ग्राह्य
धरण्यात येणार नाहीत.*
➡
*विशेष शिक्षक सवर्ग भाग-२ मध्ये फॉर्म भरताना आपल्या जोड़ीदाराच्या
शाळेचे/ कार्यालयाचे अंतर हे ३० की.मी.पेक्षा जास्त असेल तरच आपण फॉर्म
भरावा.चुकीचे अंतर दर्शवून फॉर्म भरणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.*
➡
*शासन निर्णयात उल्लेख केल्याप्रमाणे इतर कार्यालात /संस्थेत असणारा आपला
जोडीदार हा त्या कार्यालयातील सेवेत कायम असणे गरजेचे आहे.बदलीसाठी सवलत
मिळावी म्हणून तात्पुरत्या/हंगामी स्वरूपात कामाला असणाऱ्या आपल्या
जोड़ीदाराच्या सेवेचा बदलीसाठी फायदा घेता येणार नाही.आपल्या जोडीदाराच्या
कार्यालयाच्या बाबतीत चुकीची माहिती देवून शासनाची फसवणूक केल्यास अशा
कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद
घ्यावी. परंतु,जि.प.शाळेत कार्यरत असलेला आपला जोडीदार जर शिक्षण सेवक अथवा
स्थायित्व लाभ न मिळालेला (हंगामी कर्मचारी) असेल तरीही आपण विशेष शिक्षक
संवर्ग भाग-२ मध्ये फॉर्म भरू शकाल.*
➡
*ज्या शिक्षकांची या महिन्यात आंतर जिल्हा बदली झालेली आहे व अशा
शिक्षकांना अद्याप नवीन जिल्ह्यांनी पदस्थापना दिलेली नाही,अशा
शिक्षकांच्या जोडीदाराला विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ अंतर्गत फॉर्म भरता
येईल का? अशी विचारणा सारखी होत आहे,तरी या पोस्ट द्वारे अशा शिक्षकांना
सूचित करण्यात येत आहे की,अशा शिक्षकांच्या जोडीदाराला विशेष शिक्षक संवर्ग
भाग-२ अंतर्गत फॉर्म भरता येणार नाही.*
➡
*परंतु ज्या शिक्षकांची या वर्षी आंतर जिल्हा बदली झालेली आहे व अशा
शिक्षकांना पदस्थापणा देखील मिळालेली आहे आणि या पदस्थापनेचे ठिकाण जर
आपल्या जोडीदाराच्या शाळेपासून/कार्यालयापासून ३० कि.मी पेक्षा अधिक दूर
असेल तर अशा
आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांचा जोडीदार (जो पूर्वीपासून याच
जिल्ह्यात कार्यरत आहे)हा विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ अंतर्गत जिल्हा
अंतर्गत बदली मध्ये फॉर्म भरू शकतो.परंतु काही शिक्षकांच्या बाबतीत
पति-पत्नी दोघांचीही याच वर्षी आंतरजिल्हा बदली झालेली आहे अशा शिक्षकांना
मात्र या संवर्गात आपला फॉर्म भरता येणार नाही.*
➡
*विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ साठी फॉर्म भरण्यासाठी सेवा किती वर्ष होणे
गरजेचे आहे याबाबत कोणतीही अट नाही.परंतु जर आपण विशेष शिक्षक संवर्ग भाग-२
मध्ये येत असाल आणि आपल्यापैकी एकाची/दोघांची सलग सेवा सोपे क्षेत्रांत १०
वर्षे पेक्षा अधिक झालेली असेल (म्हणजेच आपण बदली पात्र असाल) तरी देखील
आपण विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ मध्ये फॉर्म भरलेला नसेल अशा वेळी बदली
अधिकार प्राप्त शिक्षकांनी आपली जागेवर अधिकार सांगितला तर आपली व आपल्या
जोडीदाराची बदली होऊ शकते याची नोंद घ्यावी.*
➡
* विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ च्या कर्मचाऱ्यांना बदलीस नकार देण्याचा
कोणताही अधिकार व ट्रान्सफर पोर्टल मध्ये तशी सुविधा देखील देण्यात आलेली
नाही व दिली जाणारही नाही याची नोंद घ्यावी*
➡
*३० कि.मी अंतराची जी अट देण्यात आलेली आहे ते अंतर हवाई अंतर नसून आपल्या
जोडीदाराच्या शाळेच्या/कार्यालयाला जाणाऱ्या जवळच्या रस्त्याचे आहे हे
लक्षात घ्यावे.*
➡
* विशेष शिक्षक संवर्ग-१ साठी फॉर्म भरताना त्या अंतर्गत येणाऱ्या
शिक्षकांना जर बदली हवी असेल तर त्यांना ट्रान्सफर पोर्टल मध्ये फॉर्म
भरण्याची आवश्यकता आहे याची नोंद घ्यावी.जर त्यांना बदली नलो असल्यास देखील
ट्रान्सफर पोर्टल मध्ये त्यांनी नकार नोंदवण्यासाठी फॉर्म भरणे गरजेचे
आहे.तसे न केल्यास त्यांच्या जागेवर इतर शिक्षकांची बदली झाल्यास त्यांची
इतर ठिकाणी बदली होऊ शकते.*
➡
*टीप: विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ मध्ये काही महत्त्वाचे बदल होणार
असल्याने फॉर्म कसा भरावा यासाठीचे आज उपलब्ध होणारे मॅन्युअल उद्या दुपारी
१२ वाजता आमच्या* pradeepbhosale.blogspot.in *या ब्लॉगवर व ट्रान्सफर पोर्टल वर download करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.*
*धन्यवाद....*
विशेष संवर्ग शिक्षक भाग 2, बदली विवरण पत्र क्र ४ विषयी.....
1जर पती आणि पत्नी यांच्या कार्यरत शाळामधील अंतर जर 3O कि मी पेक्षा
जास्त असेल तर त्या *दोघांना विशेष संवर्ग २*चा दर्जा प्राप्त होतो.
म्हणून त्या दोघांपैकी एकाने ( म्हणजे ज्याला बदली पाहीजे आहे) विवरण पत्र- ४ भरून दयावे
*2दोघांना बदली मागता येणार नाही.फक्त एकाची बदली होईल.*
*3विशेष संवर्ग भाग २ चा लाभ घेण्यासाठी सेवेचे, सेवाजेष्ठतेचे कसलेही बंधन नाही*
तो आपल्या जोडीदाराचीसुद्धा शाळा मागू शकतो.
*4अर्ज एकाने केल्यानंतर जर दुसऱ्याचे नांव बदली पात्र यादीत असेल तर ते वगळले जाईल*
5जर पती- पत्नी कर्मचाऱ्यांच्या कार्यरत शाळामधील अंतर 3OKM पेक्षा कमी
असेल तर त्यांना विशेष संवर्ग भाग २ चा दर्जा प्राप्त होणार नाही*
6मात्र ३0KM च्या आतील (म्हणजे एकत्रीकरण झालेले)पती पत्नींपैकी दोघाला
विनंती बदली पाहीजे असेल असेल तर ३0 KM च्या आत *१युनिट* मानून एकाच शाळेत
किंवा वेगवेगळ्या शाळेत बदली मागता येते.
7मग या ठिकाणी पती पत्नी या *दोघांपैकी १ बदली पात्र आणि १ बदली अपात्र
असेल* तरीही त्यांना १ युनिट मानून विनंती बदली मागता येणार आहे त्यांनी २०
पसंतीक्रम देताना *प्रथम रिक्त* पदांची निवड करावी. नंतर तुमच्यापेक्षा
ज्युनिअर शिक्षकांच्या शाळांचा समावेश पसंतीक्रमात करावा
*8विनंती बदली रद्द करता येणार नाही*
जर दुर्देवाने सोईची शाळा नाही मिळाली तर........
9संवर्ग २ मधील अर्जदार *कोणत्याही बदलीपात्र शिक्षकाची जागा घेऊ शकतो.*
सिनियरची जागा सुद्धा घेऊ शकतो *अपवाद संवर्ग १मधील सूट मागीतलेले*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*💥बदली विवरण पत्र Online भरताना खालील काळजी घ्यावी💥*
1अगोदर कोऱ्या फॉर्मची प्रिंट काढा. तो काळजीपूर्वक भरा. मग *Online फॉर्म BEO किंवा HM कार्यालयातून भरावा*
2तत्पूर्वी स्टाफ पोर्टलवरील सर्व नोंदी बरोबर आहेत का? याची खात्री करा
विशेष करुन *मूळ नेमणुक तारीख, जन्मदिनांक,करंट मॅनेजमेंट तारीख बरोबर
असने महत्वाचे आहे.*अन्यथा आपल्या बदलीस तांत्रीक अडचणी येऊ शकतात. *कदाचित
बदली रद्दही होऊ शकते.* *जर स्टाफ पोर्टल वरील माहीती चुकीची असेल तर
प्रथम ती दुरुस्त करा* नंतर बदली अर्ज भरा.
*3पसंतीक्रमाच्या २० शाळा निवडताना काळजी घ्या*कारण यापूर्वी संवर्ग १ चे फॉर्म भरलेले आहेत
4तुम्ही भरलेला बदलीअर्ज वेरिफाय करण्याअगोदर तुम्हाला त्यात बदल करता
येईल. *वेरिफिकेशन झाल्यानंतर Online बदली अर्जात बदल करता येणार नाही*
*5जर तुम्ही चुकीची माहीती भरली तर तुम्हाला शासन होऊ शकते.*म्हणून बरोबर माहीतीच भरा.
@उपशिक्षक -सेवाज्येष्टता यादि--पुणे जि.प.@