*शालेय पोषण आहार पोर्टल म्हणजेच MDM पोर्टल मध्ये 30 नोव्हेंबर 2016 रोजीचा शिल्लक धान्य व धान्यादी माल (Closing Balance) नोंद करण्याबाबतच्या मॅन्युअल बाबत* __________________________________________
प्रत्येक जिल्ह्याचे पोषण आहार धान्य व धान्यादी माल वाटप प्रमाण वेगवेगळे असल्याने आणि MDM पोर्टलला संपूर्ण राज्यासाठी एकच प्रमाण दिले असल्याने शाळेत असलेल्या प्रत्यक्ष शिल्लक साठा आणि MDM पोर्टलमध्ये सिस्टिम कडून जनरेट झालेला शिल्लक साठा यात तफावत असल्याचे दिसून आले आहे.ही तफावत दूर करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून दिनांक 30 नोव्हेंबर 2016 चा शाळेत असलेला (नोंद वहीप्रमाणे) प्रत्यक्ष शिल्लक साठा (Closing Balance) हा MDM पोर्टलमधील शिल्लक साठ्यासोबत जुळवून नोंद करावयाचा आहे.यासाठी शाळेतील शिल्लक साठा हा अंतिम समजून त्याप्रमाणे MDM पोर्टल मधील शिल्लक साठ्यामध्ये योग्य तो बदल करावयाचा आहे.तशी सुविधा MDM लॉगिन ला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.यासाठी खालील सूचना वरिष्ठ स्तरावरून देण्यात येत आहे.
🔸 *सूचना* 🔸
*सर्व शाळांनी दिनांक 22/12/2016 ते 31/12/2016 या मुदतीमध्ये आपल्या शाळांमध्ये दिनांक 30 नोव्हेंबर 2016 रोजी असलेला प्रत्यक्ष शिल्लक साठा (नोंद वहीमध्ये नोंद असलेला धान्य व धान्यादी माल) आपल्या शाळेच्या MDM पोर्टल ला नव्याने नोंद करावयाचा आहे.*
हे करत असताना आपल्याकडून या वेळी कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही याची काटेकोरपणे मुख्याध्यापकाने काळजी घ्यायची आहे.चुकलेल्या माहितीमुळे भविष्यात काही समस्या निर्माण झाल्यास संबंधितास जबाबदार धरण्यात येणार आहे.
*ही माहिती MDM पोर्टल मध्ये कशी भरायची याबाबत चे मॅन्युअल आज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे वाचण्यासाठी/Download करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.*
*मॅन्युअल डाउनलोड करण्यासाठीची लिंक :*
Click here
*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
 
