Work Hard in Silence..Let Your SuccessNoise..

बदली संवर्ग 1 मधील शिक्षकांसाठी विषय- विशेष संवर्ग -1 च्या बदलीचे Form भरले असल्यास त्याची हार्ड Copy Office ला सादर करणेबाबत… महॊद्य / महोद्या आपणांस कळविण्यात येते की आपण जर संवर्ग 1 अंतर्गत जिल्हा अंतर्गत बदली साठी Online Form भरले असल्यास सदर Form ची Hard Copy ( Print ) तसेच त्या सॊबत खालील आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. 1) जन्मातारखेचा पुरावा (Service Book च्या पानाची Zerox जेथे जन्मतारखेचा उल्लेख असल्यास, उत्तम ) 2) सेवा सुरू तारखेचा पुरावा 3) या शाळेवरील रूजु तारखेचा पुरावा 4) ज्या विशेष संवर्ग 1 मधुन आपण Form भरला आहे ,त्याचा पुरावा. 5) जातीच्या दाखला 6) जात पडताळणी दाखला ज्या संवर्ग 1 मधील शिक्षकांनी बदली साठी नकार दिला आहे त्यांनी सुद्धा नकार दिलेल्या Form ची हार्ड Copy जमा करायची
अतिमहत्वचे👇🏻👇🏻👇🏻 *शाळा पोर्टल* : 1) आज पासून स्कूल पोर्टल ची माहिती भरण्यासाठीची online आणि ऑफलाईन सुविधा औरंगाबाद विभागासाठी उपलब्ध करून दिली आहे याची नोंद घ्यावी.आणि पुढील 2 दिवसात संपूर्ण राज्यासाठी लॉगिन उपलब्ध केले जाणार आहे.शाळा पोर्टल माहिती भरण्यासाठी *15 सप्टेंबर 2016* ही राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांसाठी अंतिम मुदत आहे.या वर्षीची संचमान्यता या माहीन्याअखेर करावयाची असल्याने सदर काम प्राधान्याने करावयाचे आहे म्हणून आपणास मुदत वाढ दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी. 2)ऑफलाईन माहिती भरत असताना ही माहिती फक्त internet explorer या browser मध्येच भरायची आहे,यासाठी mozilla अथवा crome या ब्राऊजर चा उपयोग करू नये.तसेच Internet explorer चे व्हर्जन हे 9 च्या पुढचे असावे.अन्यथा software काम करणार नाही याची नोंद घ्यावी. 4) ऑफलाईन माहिती भरताना डाउनलोड केलेल्या file या c ड्राईव्ह मध्ये न ठेवता D ड्राईव्ह मध्ये save करावी आणि मगच extract करावी,अन्यथा आपण भरत असलेली माहिती save होणार नाही किंवा माहिती भरत असताना software योग्य पद्धतींने काम करणार नाही याची नोंद घ्यावी. 5)आपण ऑफलाईन पद्धतीने माहिती भरल्यानंतर योग्य पद्धतीने भरलेल्या स्क्रीन या सरळ केंद्रप्रमुखाच्या लॉगिन ला verification साठी उपलब्ध होईल याची नोंद घ्यावी.ज्या स्क्रीन चूकतील त्या मुख्याध्यापक लॉगिन ला दूरस्थ करण्यासाठी उपलब्ध असतील 6) ज्या शाळेत इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही अशा शाळेस माहिती भरण्यासाठी ऑफलाईन सुविधा उपलब्द्ध केलेली आहे.अशा शाळा आपल्या केंद्रप्रमुखाकडून किंवा गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून ऑफलाईन माहिती भरावयाचे सॉफ्टवेअर उपलब्ध करून घेतील.त्यांनी ते उपलब्ध करून द्यायच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आलेल्या आहेत. 7) स्कूल पोर्टल ची ऑफलाईन माहिती भरताना काही अडचण येत असेल तर आपण आपल्या *www.psvelhe1.blogspot.in* या ब्लॉग ला भेट दया.. 8) शाळा माहिती ऑफलाईन भरताना इंटरनेट explorer मधील काही सेटिंग change कराव्या लागतात.सेटिंग काय असाव्या या जाणून घेण्यासाठी माझ्या यूटूब channel ला भेट द्या. youtube/rajnikantmendhe आपली शाळांची माहिती भरून झाल्यावर इंटरनेट explorer सेटिंग security कारणास्तव पुन्हा आहे तशी म्हणजे डिफॉल्ट करून घेणे गरजेचे आहे याची नोंद घ्यावी. *MDM पोर्टल* : 9) मागील दिवसांची माहिती भरण्याची सुविधा मुख्याध्यापकासाठी बंद केलेली आहे,परंतु पुढील 10 दिवस ही सुविधा केंद्रप्रमुख आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन ला उपलब्ध आहेत याची नोंद घ्यावी. 10)MDM पोर्टल मध्ये माहिती भरण्यासाठी नाविन updated अँड्रॉईड मोबाईल अँप्लिकेशन उपलब्ध करून दिलेले आहे.जुने अँप्लिकेशन मधून पुढील 10 दिवस माहिती भरू शकाल.नंतर ते अँप्लिकेशन बंद केले जाणार आहे.तरी नवीन अँप्लिकेशन त्वरित इन्स्टॉल करा.हे अँप्लिकेशन mdm च्या पोर्टल ला download करण्यासाठी live उपलब्ध करून दिलेले आहे. 11)mdm मध्ये भरलेल्या माहितीच्या आधारे सन 2016-17 च्या प्रत्येक महिन्याचे पोषण आहार बिल तयार केले जाणार आहे.त्यामुळे माहिती भरताना आपण रोजच्या रोज भरली जाईल याची नोंद घ्यावी. 12) पोषण आहार अँप्लिकेशन मध्ये *मास्टर रीलोड* नावाची एक नवीन टॅब उपलब्ध करून दिलेली आहे.त्याद्वारे आपण या सिस्टिम मध्ये जे नवीन ऑप्शन add केले जातील ते मोबाईल अँप्लिकेशन मध्ये या ऑप्शन द्वारे वापरकर्ते update करू शकणार आहे याची नोंद घ्यावी. *विद्यार्थी पोर्टल* : 13)इयत्ता पहिलीच्या मुलांची माहिती भरण्याची संपूर्ण राज्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे याची नोंद घ्यावी.तरी सर्वांनी ही माहिती त्वरित भरून घ्यावी. 14)सरल मध्ये ज्या मुलांचे आधार नंबर मागील वर्षी भरलेले नाही अथवा ज्या मुलांचे भरले होते पण UID department कडून verify करताना invalid म्हणून सांगितले गेले तसेच या वर्षीचे इ.१ लीचे नविन मुलांचे आधार कार्ड ही सर्व माहिती दिनांक 09 सप्टेंबर २०१६ ला केंद्र शासनाच्या UID department ला त्वरीत सादर करावयाची असल्याने आपल्या शाळेतील मुलांची आधार माहिती प्राधान्याने दिलेल्या मुदतीत भरावयाची आहे याची नोंद घ्यावी. 15)काही शाळांनी मागील वर्षी तुकडी तयार केलेली होती आणि पुन्हा डिलिट केली होती व पुन्हा तयार केली होती ,तसेच काही शाळांनी काही तुकड्यांचे नाव A, B तर काही तुकड्यांचे नाव 1,2 असे दिले होते.तर अशा शाळांसाठी ऑटो प्रमोशन होताना समस्या निर्माण झालेल्या आहे.अशा शाळांतील त्या तुकडीमधील संपूर्ण विद्यार्थी पुढील वर्गात दिसत नाही आहे ही समस्या आज सकाळी सोडवण्यात आलेली आहे.अशा शाळांच्या बाबतीत इयत्ता 1 ली ची नवीन विद्यार्थी माहिती भरतांना division create करण्यासंदर्भातचा error सिस्टिम कडून दाखवला जात आहे म्हणजेच ज्या शाळांच्या नवीन मुलांची माहिती भरण्याबाबत असा error येत आहे अशा शाळांनी ही समस्याच कशा पद्धतीने दूर करावी याबाबत सविस्तर माहिती आपल्या *www.psvelhe1.blogspot.in*या ब्लॉग ला भेट द्यावी. 16) या वर्षीपासून तुकडी तयार करताना अक्षरांचा वापर न करता अंकांचा वापर करावा म्हणजेच A,B असे न करता 1,2 असे करावे. 17)ज्या शाळांमध्ये चुकून एकापेक्षा अधिक जनरल रजिस्टर निर्माण झालेले आहे अशा शाळांना ते रजिस्टर update करण्याची सुविधा दिली जाणार आहे.तसेच नवीन रजिस्टर निर्माण करण्यासाठीची सुविधा ही फक्त नवीन शाळांना निर्माण करण्यासाठी दिली जाणार आहे. 18) सध्या फक्त इयत्ता 1 लीच्या मुलांचीच माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.मागील वर्षी नोंद करायचे राहिलेले विद्यार्थी तसेच या वर्षी आपल्या शाळेत बाहेरच्या राज्यातील पहिली वगळता इतर वर्गामध्ये आलेले विद्यार्थी यांची नोंद करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करुं दिलेली जाणार आहे.परंतु ज्या शाळेचे विद्यार्थी भरायचे आहे त्यांना ही सुविधा न देता त्या शाळेच्या गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन ला उपलब्ध करून दिली जाणार आहे.गटशिक्षणाधिकारी खात्री करून त्या मुलांची माहिती भरायची किंवा कसे याबाबत निर्णय घेतील. 20) आजपासून student पोर्टल ला रिपोर्ट मध्ये संपूर्ण वर्गाची विद्यार्थी लिस्ट दाखवण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेलवे आहे.आगोदर आपणास फक्त तुकडीनिहाय विद्यार्थी माहिती पहाता येत होती आता संपूर्ण तुकड्यांची माहिती एका क्लीक वर मिळू शकणार आहे. R.S.Mendhe,Velhe....