Work Hard in Silence..Let Your SuccessNoise..

बदली संवर्ग 1 मधील शिक्षकांसाठी विषय- विशेष संवर्ग -1 च्या बदलीचे Form भरले असल्यास त्याची हार्ड Copy Office ला सादर करणेबाबत… महॊद्य / महोद्या आपणांस कळविण्यात येते की आपण जर संवर्ग 1 अंतर्गत जिल्हा अंतर्गत बदली साठी Online Form भरले असल्यास सदर Form ची Hard Copy ( Print ) तसेच त्या सॊबत खालील आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. 1) जन्मातारखेचा पुरावा (Service Book च्या पानाची Zerox जेथे जन्मतारखेचा उल्लेख असल्यास, उत्तम ) 2) सेवा सुरू तारखेचा पुरावा 3) या शाळेवरील रूजु तारखेचा पुरावा 4) ज्या विशेष संवर्ग 1 मधुन आपण Form भरला आहे ,त्याचा पुरावा. 5) जातीच्या दाखला 6) जात पडताळणी दाखला ज्या संवर्ग 1 मधील शिक्षकांनी बदली साठी नकार दिला आहे त्यांनी सुद्धा नकार दिलेल्या Form ची हार्ड Copy जमा करायची
                *सदर पोस्ट मधील ठळक बाबी* :

👉अ)   student पोर्टल चे नविन update

👉आ) MDM पोर्टल चे नविन update

👉इ) student पोर्टल मध्ये इ.१ ली ची विद्यार्थी माहिती कशी भरावी.


♦ *student पोर्टल चे नविन update*♦

१)इ.१ लीच्या मुलांची सरल student मध्ये माहिती भरण्याची सुविधा पुणे सह सर्व जिल्ह्यांना आजपासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.तरी सदर माहिती पुढील आठवड्यात त्वरीत भरून घ्यावी.

२)विद्यार्थी माहिती भरण्यासाठी आपण hm login मधून excel file ही download करून घ्यावी. excel file  ही download कशी करावी आणि पुढे काम कसे करावे याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण youtube/rajnikantmendhe या you tube channel ला भेट द्या.तसेच आपणास manual download करण्यासाठी www.psvelhe1.blogspot.in या लिंक ला क्लिक करा.

३)सरल मध्ये ज्या मुलांचे आधार नंबर मागील वर्षी भरलेले नाही अथवा ज्या मुलांचे भरले होते पण UID department कडून verify करताना invalid म्हणून सांगितले गेले तसेच या वर्षीचे इ.१ लीचे नविन मुलांचे आधार कार्ड ही सर्व माहिती दिनांक 31 ऑगस्ट २०१६ ला केंद्र शासनाच्या UID department ला त्वरीत सादर करावयाची असल्याने आपल्या शाळेतील मुलांची आधार माहिती प्राधान्याने दिलेल्या मुदतीत भरावयाची आहे याची नोंद घ्यावी.

४)सध्या फक्त इ.१ लीची च्या नविन मुलांचीच माहिती student पोर्टल मध्ये भरावयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.इतर इयत्तामधील नविन मुलांची जी मागील वर्षी नोंदवले जाणे अपेक्षित होते परंतु ज्यांची नोंद झालेली नाही आहे त्यांची माहिती भरण्याची सुविधा यथावकाश उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

५) ट्रान्स्फर,प्रमोशन,duplicate विद्यार्थी system मधून काढणे या विषयीची सुविधा student पोर्टल मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे.जोपर्यंत आपले हे काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपणास इ.१ ली वगळता इतर इयत्तांच्या नविन मुलांची माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.

👉 *duplicate विद्यार्थी सिस्टिम मधून कसे काढावे यासाठीचे video डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा* :
https://youtu.be/3LT89PrIBAE
६) जर मागील वर्षी इ.१ लीला एक तुकडी असेल आणि या वर्षी त्यापेक्षा अधिक तुकड्या झाल्या असतील तर अशा मुंलांची माहिती भरण्याआधी आपण create division या tab मधून तुकडी तयार करून घ्यावी.आणि नंतरच excel शीट download करावी.

७) excel शीट download केल्यावर ज्या मुलांची आधार माहिती भरावयाची राहिलेली आहे त्या मुलांची माहिती भरून घ्यावी.उदाहरणार्थ – एका शाळेत २०० मुलांची नावे आधार लिस्ट मध्ये दिसले.त्यापैकी १०० मुलांची आधार माहिती भरून upload केलेली आहे.त्यानंतर आता पुन्हा राहिलेल्या १०० मुलांपैकी काही मुलाची आधार माहिती भरायची आहे.जर आपण पुन्हा आधार लिस्ट download केली तर पुन्हा २०० मुलांचीच आधार लिस्ट download होईल याची नोंद घ्यावी.यासाठी आपण जी लिस्ट आधी download केली होती तीच excel लिस्ट नेहमीसाठी त्या वर्गासाठी वापरावी.त्या excel लिस्ट मधून आधी भरलेली माहिती delete करू नये.आहे तशी माहितीच्या पुढे सदर नविन माहिती आपणास भरायची आहे.त्या file ची पुन्हा csv file तयार करून पुन्हा upload करावयाची आहे. आधी भरलेल्या मुलांची माहिती जरी दुसऱ्यांदा आपण भरली तरी system त्या मुलांची माहिती स्वीकारत नाही.ज्या नविन मुलांची माहिती system कडून read केली जाईल अशाच मुलांची माहिती system आत घेते.त्यामुळे file कितीही वेळा download केली तरी वरील उदाहरणाप्रमाणे त्या २०० मुलांची नावे आपणास दिसून येईल.तसेच आधार माहिती upload केली तरी पुन्हा download केलेल्या file मध्ये,आधार status मध्ये सर्व ठिकाणी त्या मुलांचे नाव माहिती भरलेली नाही म्हणूनच दिसेल.तरी आपण गोंधळून जाऊ नये.जेंव्हा UID department ती माहिती verify करेल तेंव्हाच त्या लिस्ट मधून त्या मुलांची माहिती कमी होईल याची नोंद घ्यावी.बऱ्याच शिक्षकांना असा प्रश्न पडतो की एकदा माहिती भरली की त्या मुलांची नावे न भरलेल्या मुलांमध्ये दिसू नये.तर त्यांना अशी सुचना आहे की माहिती confirm झाल्यावरच ती नावे त्या लिस्ट मधून वगळण्यात येईल याची नोंद घ्यावी.


♦  *MDM पोर्टल चे नविन update* ♦

८) चालू शैक्षणिक वर्षात शालेय पोषण आहार माहिती भरण्याकरिता शासनाने सरल मध्ये MDM नावाचे नविन पोर्टल उपलब्ध करून दिलेले आहे.यामध्ये शाळा सुरु झाली त्या पहिल्या दिवशी अथवा १ जून रोजीचा opening balance तसेच daily attaindence आणि stock inward या बाबींची माहिती वेळोवेळी भरावयाची आहे.तरी अद्याप देखील ही माहिती बऱ्याच शाळांनी पूर्ण केलेली नाही.त्यासाठी त्यांच्या मागणी वरून सदर माहितीची अंतिम मुदत २५ ऑगस्ट २०१६ होती ती वाढवून आता २८ ऑगस्ट २०१६ पर्यंत करण्यात आलेली आहे.

९) अद्याप देखील ओपनिंग balance मध्ये बऱ्याच बांधवांनी माहिती भरली नसल्याचे  लक्षात आले आहे,ज्यांनी माहिती भरलेली आहे अशा माहितीमध्ये बऱ्याच शाळांची माहिती चुकलेली असल्याचेही लक्षात आले आहे..ओपेनिंग balance भरताना कशा पद्धतीने माहिती भरावी याबाबत नव्याने काही सुचना उदाहरणासह दिल्या जात आहेत त्या वाचा.

👉जर एखाद्या शाळेत पहिल्या दिवशी 0 kg तांदूळ शिल्लक असेल आणि त्यांनी पहिल्याच दिवशी १०० kg तांदूळ उसना घेतला असेल तर अशा शाळांनी opening balance मध्ये 0 लिहावे आणि stock inward मध्ये १०० kg लिहावे.

👉जर एखाद्या शाळेत पहिल्या दिवशी १२ kg तांदूळ शिल्लक असेल आणि दुसऱ्या दिवशी १०० kg तांदूळ घेतला असेल तर opening balance मध्ये १२ kg लिहावे आणि stock inward मध्ये १०० kg लिहावे.

👉जर एखाद्या शाळेने एप्रिल मध्ये ३०० kg तांदूळ उसना घेतला असेल,त्यापैकी १०० kg तांदूळ मागील शैक्षणीक वर्षात वापरला असेल आणि २०० kg शिल्लक असेल तर अशा शाळेने opening balance मध्ये २०० kg ची नोंद घ्यावी.या २०० kg चे stock inward मध्ये नोंद घ्यायची आवशकता नाही हे लक्षात घ्यावे.

👉शेजारील शाळेतून उसना घेतलेला तांदूळ नोंद करताना ज्या शाळेने तांदूळ उसना घेतला असेल त्या शाळेने stock inward मध्ये नोंद घेताना त्या शाळेचा udise नंबर टाकायला विसरू नये म्हणजे त्या शाळेच्या stock मधून तो उसना घेतलेला तांदूळ system ला कमी करता येईल.(ज्या शाळेने तांदूळ उसना दिला आहे त्या शाळेने online माहितीमध्ये काहीही नोंद करू नये.त्यांनी फक्त शाळेतील रजिस्टर वर नोंद घ्यावी.)उसना घेतलेला तांदूळ त्या शाळेला परत करायची गरज नाही हे लक्षात घ्यावे.

👉रविवार सारख्या सुट्टीच्या दिवशी शाळेने online मध्ये कोणतीही माहिती भरू नये.

👉५ वी आणि ८ वीचा वर्ग यावर्षी वाढला असेल अशा शाळांनी आपल्या वाढलेल्या वर्गाची नोंद गटशिक्षणाधिकारी यांच्या login मधून करून घ्यावी.मात्र इयत्ता ६ वी चा वर्ग नव्याने वाढला असेल अशा शाळांना वर्ग वाढण्याची विनंती ही शिक्षणाधिकारी यांच्याकडे करावी.beo कडे मागणी करू नये.

👉काही शाळांनी १ ते ५ या वर्गांची opening balance ची माहिती भरून पाठवली आहे परंतु ६ ते८ ची माहिती भरायची राहून गेली आहे आणि ती माहिती beo लेवल वरून verify देखील झालेली आहे. अशा शाळांनी आपली माहिती शिक्षणाधिकारी यांच्या login मधून reject करून घ्यावी.
👉आपण भरलेली माहिती चुकलेली असेल आणि ती माहिती रेजेत करावयाची आहे अशी माहिती कोणत्या login मधून reject करावी याबाबत खालील माहिती वाचा.

✏ *opening balance* : beo login ने verify केला असेल तर EO login मधून reject करून घ्यावा.

✏ *daily attaindence* चुकला असेल तर दिनांक २८ ऑगस्ट पर्यंत मुख्याध्यापक स्वतः च्या login मधून दुरुस्थ करू शकतील त्यानंतर मात्र beo login कडून reject होऊ शकेल.२८ ऑगस्ट नंतर ही माहिती गटशिक्षणाधिकारी यांच्या login मधून reject करता येईल.

✏ *stock inward* चुकला असेल तर शिक्षणाधिकारी यांच्या login मधून reject होऊ शकेल.

 ✏५ वी इयता अथवा ८ वी इयत्ता नव्याने निर्माण झाली असेल तर ती add करण्याकरिता गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून opening balance च्या फॉर्म मधून  add होईल.जर त्या शाळेचा opening balance verify झालेला असेल तर ती माहिती शिक्षणाधिकारी यांच्याकडून reject करून घेऊन गटशिक्षणाधिकारी पुन्हा तो वर्ग त्यांच्या login मधून add करून देतील.

✏ *शाळा ग्रामीण /शहरी नोंद घेताना चूक झालेली असेल तर ती माहिती गटशिक्षणाधिकारी दुरुस्थ करून देतील* .


➡ *टीप* : आपल्या चुकीच्या अथवा अपूर्ण माहिती मुले बील तयार होताना काही समस्या निर्माण झाल्या तर यासाठी संबंधित व्यक्तीला जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.

👉1) विद्यार्थी प्रमोशन होत नाही,ट्रान्स्फर विनंती approve होत नाही,approve होऊन आलेले विद्यार्थी update ला दिसत नाही अशा समस्या काही शाळांना येताना दिसून येत आहे,अशा समस्या अशाच शाळांना आहे ज्यांची मागील वर्षीच्या data मध्ये technical error आलेला आहे.उदाहरणार्थ रजिस्टर नंबर लिहिताना अंका सोबत अक्षरे भरलेले असणे,तुकडी भरताना चुकीच्या format मध्ये भरणे,मुलांची माहिती .csv मध्ये convert करून upload करताना चुका झालेल्या असणे इत्यादी.अशा शाळांना विनंती आहे की आपणास अशा समस्या असतील तर कृपया आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या समस्या सविस्तर लिहून पाठवा.आपल्या माहितीमध्ये पूर्वी झालेल्या चुका दुरुस्थ करून आपल्या या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.आपण या बाबीचा गांभीर्याने विचार केला नाही तर आपणास संच मान्यता,udise,पायाभूत चाचणी व अन्य परीक्षेचे गुण भरताना अथवा मुलाच्या लाभाच्या शासकीय योजना राबवताना online माहितीमध्ये समस्या निर्माण होऊ शकणार आहे.